निदा खानसह अनेक आरोपींची कोठडीत कायम

नाशिक फाईल्स प्रकरणात तपास वेगात

    दिनांक :31-May-2026
Total Views |
नाशिक
Nida Khan Remains in Custody नाशिक फाईल्स संबंधित कथित लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात आरोपी निदा खान हिला सध्या कोणताही दिलासा मिळालेला नाही. तिच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता 12 जून रोजी होणार असल्याचे नाशिक रोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे.याच प्रकरणातील अन्य आरोपी दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जांवरही त्याच दिवशी सुनावणी होणार आहे. निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती आणि 11 मे रोजी तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर तिच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
 
 
needa
 
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या आठ गुन्ह्यांशी संबंधित हे आरोपपत्र भारतीय न्याय संहिता अंतर्गत सादर करण्यात आले आहे. या आरोपपत्रात अनेक आरोपींची नावे नमूद करण्यात आली असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.यापूर्वी 22 मे रोजी एसआयटीने देवलाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणात 1500 पानांचे मोठे आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
तक्रारदार महिलांनी आरोप केला आहे की टीसीएस नाशिक युनिटमध्ये काही कर्मचाऱ्यांवर धार्मिक प्रथांचे पालन करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग, मानसिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.निदा खानवर विशेषतः महिला कर्मचाऱ्यांवर विशिष्ट पोशाख आणि धार्मिक वर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून तपास सुरू आहे. दरम्यान, टीसीएस कंपनीने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कोणत्याही प्रकारच्या छळ किंवा सक्तीविरोधात आपली ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका असल्याचे स्पष्ट केले असून संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे.