नितीन गडकरी पोहोचले अरुण अडसड यांच्या भेटीला

    दिनांक :31-May-2026
Total Views |
अमरावती, 
Nitin Gadkari Visits Adsul केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी दुपारी अमरावती दौऱ्यावर आले. त्यांनी गणेडीवाल लेआउट येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुणभाऊ अडसड यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आमदार प्रताप अडसड व धामणगावच्या नगराध्यक्ष अर्चना रोठे - अडसड यांनी प्रवेशद्वारावर नितीनजींचे स्वागत केले. त्यानंतर नितीनजींनी अरुणभाऊ अडसड यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रकृतीची विचारपूस केली. दोघांच्याही चर्चेदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. प्रतिभाताई अडसड यांनी नितीनजींचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.
 
 
v
 
 
यावेळी अडसड कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. अर्धा तास या सर्वांमध्ये कौटुंबिक गप्पा रंगल्या. नितीनजींच्या भेटीनंतर भाजपाच्या अन्य नेते व पदाधिकाऱ्यांनी अरुणभाऊंची भेट घेतली. त्यात आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, तुषार भारतीय, दीपक पोहेकर, नितीन गुधडे पाटील, श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टचे सचिव राम महाजन, सुनील सरोदे, श्रीकांत काळीकर, अनिता व्यवहारे त्यांच्यासह इतरांचा समावेश होता.