प्रतापनगरवासीयांचा ओसीडब्ल्यू कार्यालयाला घेराव

    दिनांक :31-May-2026
Total Views |
- अनियमित जलपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त
- प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदाेलनाचा इशारा

नागपूर, 
OCW: Water Supply प्रतापनगर परिसरातील अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याविराेधात संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी लक्ष्मीनगर झाेन अंतर्गत असलेल्या ओसीडब्ल्यू कार्यालयावर घेराव घालून प्रशासनाचे लक्ष वेधले. परिसरातील जलपुरवठ्याच्या समस्या तातडीने साेडवून नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी केली.
 
 
ocw
 
जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, प्रतापनगर नागरिक मंडळाचे प्रा. सपन नेहराेत्रा, नितीन नायडू, सुरेश रेवतकर, जनशक्ती मंचचे मन्नूजी दत्ता, दीनानाथ पडाेळे तसेच मेगा ग्रुपचे संचालक गिरीश पांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदाेलन करण्यात आले. यावेळी ओसीडब्ल्यूचे मनाेज सांगीडवार यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारले.
 
 
OCW: Water Supply  निवेदनानुसार, गेल्या तीन महिन्यांपासून काेणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठ्याच्या वेळांमध्ये वारंवार बदल करण्यात येत आहेत. तसेच पाण्याच्या मीटरचे रीडिंग वाढत असल्याने नागरिकांना अतिरिक्त बिलांचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये पाण्याचा दाब अत्यंत कमी असून पाणी आठ ते नऊ फूट उंचीपर्यंतही चढत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. काही ठिकाणी तर नळांमधून पाणीच येत नसल्याने रहिवाशांना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन जलपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा व्यापक स्वरूपाचे आंदाेलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदाेलकांनी दिला. यावेळी मुन्ना महाजन, श्याम वाघ, डाॅ. आशिष कडू, निखिल कनाैजिया, नरेश लाेखंडे, अभिनव फटिंग, मंगेश कामाेने, मिलिंद महादेवकर, निलिकेश काेल्हे, आल्हाद जगम, विश्वास पक्किडे, मिलिंद जगताप, राहुल आमदरे आदी नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.