पारवा परिसरात काळी आई हिरवा शालू नेसण्यासाठी सज्ज

    दिनांक :31-May-2026
Total Views |
मात्र 32 हजार कोटींमधील 17 हजारांच्या विम्याअभावी शेतकरी हवालदिल

पारवा, 
Parwa: Farmers केळापूर-आर्णी विधानसभा क्षेत्रातील घाटंजी तालुक्यांत पारवा परिसरात खरीप हंगामाची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. कडक उन्हाळ्यानंतर आपली ‘काळी आई’ हिरवागार शालू नेसण्यासाठी सज्ज आहे. मात्र बळीराजा शासकीय अनास्था, बँकेची अडवणूक आणि खत टंचाई यांच्या तिहेरी कात्रीत सापडला आहे. राज्य शासनाच्या 32 हजार कोटींच्या विशेष पॅकेजमधील हक्काची मदत पूर्ण न मिळाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे.
 
 
jamin
 
शनिवार, 30 मे रोजी पंचांगानुसार दुपारी 1.20 वाजेपर्यंत विशाखा नक्षत्र होते. त्यानंतर अनुराधा नक्षत्र सुरू झाले. नक्षत्रांच्या या बदलासोबतच पारवा परिसरातील शेतकरी बांधवांनी नांगरणी आणि वखरणीची कामे पूर्ण करून ठेवली आहेत. सर्वांचे डोळे आता ‘मृग नक्षत्रा’कडे लागले आहेत. मात्र, पेरणीचे दिवस तोंडावर आले असताना शासनाने जाहीर केलेल्या 2 लाखांच्या कर्जमाफीनंतरही स्थानिक बँका शेतकèयांना नवीन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यातच बाजारात खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. घाटंजी तालुक्यासह संपूर्ण क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने या गंभीर परिस्थितीची दखल घ्यावी. विमा कंपन्यांना तत्काळ 17,000 रुपयांचा खरीप विमा वाटप करण्याचे आदेश द्यावेत, तसेच बँकांची अडवणूक थांबवून खतांचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकèयांकडून केली जात आहे.
पॅकेजची मदत अर्धवट : 17 हजारांचा विमा रखडला !
Parwa: Farmers राज्य शासनाने शेतकèयांसाठी 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजअंतर्गत एकूण 35,500 रुपये मदत जाहीर झाली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात कोरडवाहू शेतकèयांना 8,500 रुपये देण्यात आले. दुसèया टप्प्यात रब्बी हंगामासाठी हेक्टरी 10,000 रुपये (3 हेक्टरपर्यंत) वितरित करण्यात आले. मात्र, जाहीर केल्याप्रमाणे खरीप हंगामातील सर्व पिकांसाठी मिळणारे उर्वरित 17,000 रुपये विमा कंपन्यांकडून अद्यापपर्यंत शेतकèयांच्या पदरात पडलेले नाहीत.
विमा कंपन्यांच्या या आडमुठ्या आणि नफेखोर धोरणामुळे पारवा परिसरातील शेतकरी आपल्या हक्काच्या पैशांपासून वंचित आहे. हातात पैसा नाही, बँका कर्ज देत नाहीत आणि विमा कंपन्या पैसे दाबून बसल्या आहेत. अशा परिस्थितीत आम्ही खते आणि बियाणे कशी खरेदी करावी आणि खरीप पेरणी कशी करावी, असा संतप्त प्रश्न येथील शेतकरी विचारत आहेत.