1 किलो 285 ग्रॅम गांजा जप्त
डी बी पथकाची कारवाई
उमरखेड,
Person Selling Marijuana Arrested अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तीस उमरखेड-नांदेड महामार्गावरील मार्लेगाव फाटा येथे गांजा विक्री करताना अटक करण्यात आली. स्थानिक डीबी पथकाने ही कारवाई शनिवार, 30 मे रोजी केली. स्थानिक जामा मशिद वार्डातील शेख इब्राहिम उर्फ इरफान शेख पाशू (वय 25) हा उमरखेड-नांदेड महामार्गावरील मार्लेगाव फाट्यावर अवैध गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून स्थानिक डीबी पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्यास रंगेहात पकडले.
Person Selling Marijuana Arrested यावेळी शेख इब्राहिम हा एका पिशवीत गांजा अंमली पदार्थ त्यामध्ये काही गांजा हा प्लॅस्टिकच्या पुड्यामध्ये पॅक केलेला होता. ज्याचे पिशवीसह वजन 1.285 किलो असून त्यास ताब्यात घेऊन कलम 8 (क), 20 (ब), (ळळ) (ब) एनडीपीएस अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात डीबी प्रमुख उपनिरीक्षक सागर इंगळे, संदीप ठाकूर, संघशिल टेंभरे, दिगांबर गिते, किरण राठोड, अंकुश दरबस्तेवार यांनी यशस्वी पार पाडली.