पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे वाहनधारक चिंतेत
दारव्हा,
Petrol and Diesel Shortage शहरातील बहुतेक पेट्रोलपंपांवर शनिवार, रविवारी पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवला. यामुळे नागरिकांसह शेतकèयांची मोठी गैरसोय झाली. वाहनधारकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अनेकजण इंधन मिळेल या आशेने पेट्रोल पंपांवर चकरा मारत होते. पण कुठेही इंधन उपलब्ध नसल्याने रिकाम्या हातांनी गावाकडे परतावे लागत होते.
Petrol and Diesel Shortage पेट्रोल आल्याचे समजताच शहर व शहरालगतच्या पेट्रोल पंपावर भली मोठी रांग पहायला मिळाली. डिझेल तुटवड्यामुळे अनेक शेतकèयांची शेतीची कामे खोळंबली आहेत. वेळेत इंधन उपलब्ध न झाल्यास शेतीची कामे रखडण्याची भीती आहे. सध्या खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून नांगरणी, वखरणी व इतर मशागतीची कामे सुरू आहेत. ट्रॅक्टर व कृषी यंत्रांसाठी डिझेल अत्यावश्यक असताना अचानक निर्माण झालेल्या डिझेलच्या टंचाईमुळे शेतकरी चिंतेत आहेत. दारव्ह्यासारख्या शहरात इंधन टंचाई निर्माण झाल्याने पुरवठा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पेट्रोल व डिझेल टंचाईमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारक, व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे.