नवी दिल्ली,
Petrol पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर लागू असलेल्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात (विंडफॉल) केंद्र सरकारने 50 टक्क्यापर्यंत कपात केली. नवीन दर 1 जूनपासून लागू होणार आहे.
देशांतर्गत बाजारात इंधनाची पुरेशी उपलब्धता राखण्यासाठी पूर्वी आकारण्यात आलेल्या शुल्काचा वेळोवेळी आढावा घेतला जातो, असे सरकारने म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाच्या प्रसिद्धिपत्रकानुसार पेट्रोल निर्यातीवरील शुल्क निम्मा करून प्रति लिटर 1.5 करण्यात आला, डिझेलवरील हा कर प्रति लिटर 13.5 आणि विमान इंधनावरील कर प्रति लिटर 9.5 पर्यंत कमी करण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेल निर्यातीवरील रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकर शून्य राहणार आहे. सरकारने स्पष्ट केले की, देशांतर्गत वापरासाठी होणाèया Petrol पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याच्या शुल्क दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 16 मे रोजी प्रति लिटर 3 रुपये लावण्यात आले होते. आढाव्यानंतर, 1 जूनपासून ते प्रति लिटर 1.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले. डिझेलच्या निर्यातीवरील शुल्क प्रति लिटर 16.5 रुपयांवरून प्रति लिटर 13.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, विमान इंधन शुल्क प्रति लिटर 16 रुपयांवरून प्रति लिटर 9.5 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे.