मुंबई,
Powai child murder मुंबईतील पवई परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ चार वर्षांच्या अपंग मुलाची त्याच्या जन्मदात्या पित्यानेच अमानुषपणे हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
पवई पोलिसांनी या प्रकरणी राजेश सिंह या नराधम पित्याला अटक केली आहे. आरोपीची पत्नी कौटुंबिक वादातून सुमारे १५ दिवसांपूर्वी घर सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेली होती. त्यानंतर राजेश मानसिक तणावात होता आणि दारूच्या आहारी गेला होता. घरात तो आणि त्याचा चार वर्षांचा अपंग मुलगा एवढेच राहत होते.हा चिमुकला जन्मतःच अपंग असल्याने त्याला चालता किंवा बोलता येत नव्हते. घटनेच्या दिवशी तो भुकेमुळे रडत होता. त्याच वेळी आरोपी दारूच्या नशेत घरी परतला आणि रडणाऱ्या मुलावर त्याचा राग अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने मुलाला बेदम मारहाण केली आणि थेट लाकडी दरवाजावर जोरात आपटल्याचे तपासात समोर आले आहे. या अमानुष कृत्यानंतर काही क्षणांतच मुलाची हालचाल थांबली.
घाबरलेल्या आरोपीनेPowai child murder त्यानंतर आपल्या बहिणीला घरी बोलावले आणि मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात मुलाच्या कवटीचे हाड फ्रॅक्चर झाल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.या घटनेनंतर पवई परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी राजेश सिंह याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.