घाटंजी,
Prashant Ugale घाटंजी शहर काँग्रेस अध्यक्षपदी नपचे माजी शिक्षण सभापती प्रशांत उगले यांची निवड करण्यात आली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. सचिन नाईक यांनी जिल्ह्यातील पहिली घाटंजी शहर अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आरिज बेग, संजय ठाकरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष रूपेश कल्यमवार, माजी जिल्हा परिषद सदस्य वासुदेव महल्ले, माजी नप अध्यक्ष सुभाष गोडे, तालुका उपाध्यक्ष अरविंद चौधरी, ओबीसी आघाडीचे अनंत चौधरी, गजानन ठाकरे उपस्थित होते.
प्रशांत उगले यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात विविध पदे भूषविली. घाटंजी नगर परिषदेचे माजी शिक्षण व बांधकाम सभापती, संस्कृती विकास संस्थेचे संस्थापक सचिव असून या संस्थेद्वारे पर्यावरण, निसर्ग, पाणी यावर कार्य सुरू आहे. ग्राहक पंचायतचे तालुका सचिव, वाघाडी नदी वाचवा अभियानचे संयोजक, शिक्षक महासंघाचे तालुकाध्यक्ष, कुणबी समाज परिचय मेळावा कार्याध्यक्ष इत्यादी पदे ते भूषवीत आहेत.
Prashant Ugale प्रशांत उगले वाघाडी नदी स्वच्छता खोलीकरण करत नदी पुनर्जीवन अभियान 10 वर्षांपासून राबवीत आहेत. पाण्यावर काम करीत पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते कपमध्ये श्रमदान व मार्गदर्शन केले. ते रेनवॉटर हार्वेस्टिंगवरसुद्धा कार्य करीत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी देशी वृक्ष बियाणे लागवड, वृक्षारोपणासाठी काम करीत आहेत. कोरोना काळात त्यांनी 100 दिवस गरजूंना जेवण तयार करून वाटप केले असून या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल नप अध्यक्ष परेश कारिया, नगरसेवक संगीता भुरे, माजी जिप अध्यक्ष माणिक मेश्राम, माजी नप अध्यक्ष किशोर दावडा, माजी उपसभापती डॉ. विजय कडू, अॅड. विजय भुरे, आलोक बाजपेयी, विजय देवतळे, संजय अग्रवाल, सुरेश आडे, सुनील हूड, सारंग कहाले, करण तोडसाम, रमीज शेख यांनी प्रशांत उगले यांचे अभिनदंन केले आहे.