देवळीत महागाई व विविध प्रश्नांवर निषेध

    दिनांक :31-May-2026
Total Views |
देवळी, 
Protest Against Inflation in Deoli वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, रासायनिक खतांच्या किंमतीतील वाढ तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पृष्ठभूमीवर शहरात युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत युवा संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात चारचाकी गाडीला धका मारून आंदोलन करून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
 

mahangai 
 
Protest Against Inflation in Deoli  महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नावर शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. युवा संघर्ष मोर्चा कार्यालयातून सुरू झालेली ही रॅली शहरातील मु‘य मार्गाने आठवडी बाजार चौकापर्यंत काढण्यात आली व तेथे समारोप करण्यात आला. या रॅलीत प्रवीण कात्रे, गौतम पोपटकर, गौरव खोपाळ, महेश खाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.