पुणे
Pune International Airport पुणे-गुवाहाटी विमानतळावर शुक्रवारी सकाळी थरारक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण विमानतळाचे वातावरण हादरून गेले. सकाळी पावणेसातच्या सुमारास लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आसाममधील गुवाहाटीकडे जाणारे विमान टेकऑफसाठी तयार होत होते. प्रवासी आपापले सीट बेल्ट बांधून बसले होते आणि विमान हवेत झेपावण्यासाठी सज्ज झाले होते, त्या वेळी घडलेल्या घटनेमुळे विमानातील आणि विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा तणावाखाली आल्या.
घटनेची सुरूवात विमानातील एअर होस्टेसच्या प्रसाधनगृहात जाण्यापासून झाली. तिथे तिला एका अज्ञात व्यक्तीने ठेवलेली संशयास्पद चिठ्ठी सापडली, ज्यावर ‘बॉम्ब’ असे लिहिलेले होते. ही माहिती मिळताच एअर होस्टेसने ताबडतोब विमानाचे मुख्य पायलट आणि विमानतळ सुरक्षा दलाला सूचित केले.बॉम्बसंदेशाची माहिती मिळाल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) तात्काळ विमानाचे उड्डाण रोखले. विमान धावपट्टीवरून हटवून एका सुरक्षित आणि निर्मनुष्य ठिकाणी नेण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले, आणि सुरक्षा रक्षक, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने विमानाचा सर्व भाग तपासला.या थरारक घटनेमुळे विमानाचे उड्डाण काही काळासाठी स्थगित राहिले, ज्यामुळे पुढील प्रवासात विलंब झाला. प्रवाशांमध्ये प्रचंड घाबरगुंडी पसरली होती, परंतु तत्काळ घडलेल्या कार्यवाहीमुळे कोणतीही हानी झाली नाही.
विमान कंपनीचे सहाय्यक Pune International Airport सुरक्षाप्रमुख विशालकुमार दिनेशकुमार श्रीवास्तव यांनी लोहगाव विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव घटनास्थळी तातडीने पोहोचून पाहणी केली. पोलिस सध्या विमानातील प्रवाशांची यादी, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे यांच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध घेत आहेत.या घटनेमुळे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली असून, प्रवाशांना अशा प्रकारच्या अफवांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.