'हायव्होल्टेज ड्रामा' दारूच्या नशेत बाईचा धिंगाणा

    दिनांक :31-May-2026
Total Views |
पुणे,
Pune Narhe police पुण्यातील नऱ्हे पोलिस चौकीत एक धक्कादायक प्रकार घडला असून, तक्रार नोंदवण्यासाठी आलेली ४१ वर्षीय महिला अचानक पोलीस कर्मचाऱ्यांवरच उलटल्याची घटना समोर आली आहे. चौकीत मोठा गोंधळ घालत तिने शासकीय कामकाजात अडथळा आणल्याने काही काळासाठी पोलीस चौकीतील कामकाज विस्कळीत झाले होते.
 

Pune Narhe police  
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला २७ मे रोजी एका व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी नऱ्हे पोलिस चौकीत आली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. मात्र, त्या व्यक्तीविरुद्ध अधिक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, या कारणावरून महिलेने आक्रमक भूमिका घेतली.
नऱ्हे पोलिस चौकी येथे उपस्थित असलेल्या Pune Narhe police  पोलिसांशी तिने हुज्जत घालत मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तिने वातावरण तणावपूर्ण केले. पोलिसांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न करूनही ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. या गोंधळामुळे चौकीतील दैनंदिन कामकाज काही काळ ठप्प झाले.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालय येथे पाठवले. तेथे तिची सखोल तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालात संबंधित महिला दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या अहवालानंतर नऱ्हे पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षकांच्या तक्रारीवरून संबंधित महिलेविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांशी अरेरावी करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत.दरम्यान, पोलीस चौकीतच घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.