एकजुटीने उभे राहणार लोकमातेचे स्मारक : उगे

    दिनांक :31-May-2026
Total Views |
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंती साजरी
 
हिंगणघाट, 
punyashlok ahalyadevi holkar jayanti मातोश्रींच्या नावाने १ कोटी रुपयांचे सामाजिक सभागृह उभे राहत आहे. हे केवळ विटा-सिमेंटचे काम नसून समाजाच्या एकजुटीचे जिवंत स्मारक आहे, असे प्रतिपादन लोकमाता अहल्याबाई होळकर समाज जागृती मंडळाचे अध्यक्ष गणेश उगे यांनी केले. राजमाता अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आज आज ३१ रोजी स्थानिक पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सभागृहात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक प्रा. केशव ठेमसे, मधुकर भोयर, वसंत ढोले, विठ्ठल तुरके व देविदास ढोकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
holkar
 
यावेळी सभागृह उभारणीमागील लोकसहभागाची कहाणी गणेश उगे यांनी उलगडली. आ. समीर कुणावार यांनी ४० लाख, माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी ३० लाख, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २० लाख आणि दिवंगत विधान परिषद आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी १० लाख रुपयांचा निधी दिला. या सर्व दातृत्वामुळेच हे स्वप्न साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले. गणेश उगे यांनी स्वतः १ लाख २१ हजार रुपये किमतीची अहल्यादेवींची संगमरवरी मूर्ती सभागृहात बसवण्याची घोषणा केली. यावेळी विजय उगे, कृष्णा शेंडगे, उपाध्यक्ष यादव तुराळे आणि दिलीप भगत यांनीही हातभार लावण्याचे जाहीर केले. नगरसेवक रवी रोहणकर यांनी वॉल कंपाउंडचे काम पूर्ण करण्याचे व आ. कुणावर यांच्यामार्फत स्वयंपाकगृहाचे काम करून देण्याचे आश्वासन दिले.
 
 
 
punyashlok ahalyadevi holkar jayanti  यावेळी कवी वासुदेव पडवे यांनी अहल्यादेवींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अ‍ॅड. अस्मिता मुंगल यांनी राजमातेच्या न्यायप्रिय कारभाराचे, स्त्री-सक्षमीकरणाचे आणि धर्मरक्षणाचे कार्य विषद केले. कार्यक्रमाला दिलीप बोभाटे, वासुदेव पडवे, कृष्णा शेंडगे, सुधीर तिनघसे, हेमराज हुलके, प्रवीण घुरडे, डॉ. दिगंबर येडे, अरविंद मुंगल, रजनी बोभाटे, अनिता उगे, निलीमा पडवे, शालिनी उगे आदींची उपस्थिती होती.