रणवीर सिंगचा ‘प्रलय’ चित्रपट ठरणार गेमचेंजर?

    दिनांक :31-May-2026
Total Views |

Ranveer Singh 
 
 
मुंबई,
Ranveer Singh's movie Pralay बॉक्स ऑफिसवर मागील काही वर्षांत मिश्र यश मिळाल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा आगामी ‘प्रलय’ चित्रपट रिलीज होण्याआधीच ३००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करू शकतो का, यावर फिल्म इंडस्ट्रीत चर्चा रंगली आहे. आता सर्वांचे लक्ष ‘प्रलय’ या आगामी चित्रपटाकडे लागले आहे. या चित्रपटाचे बजेट सुमारे ३०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मुंबईतील महामारी आणि झोम्बी या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा असल्याने चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात कल्याणी प्रियदर्शन मुख्य भूमिकेत दिसणार असून तिने याआधी ‘लोका: चॅप्टर १’ मधून चांगली छाप पाडली होती. याशिवाय रणवीर सिंग ‘चंद्रगुप्त’ आणि ‘अश्वत्थामा’ यांसारख्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्येही झळकणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच्या करिअरचा आलेख कुठपर्यंत जातो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.