संत केजाजी महाराज पायदळ दिंडीचे २६ जून रोजी प्रस्थान
सेलू,
Saint Kejaji Maharaj's Dindi आषाढी वारीचे वेध म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र व चैतन्यदायी अशा पंढरीच्या वारीच्या सुरूवातीची लागलेली ओढ असते. प्रतीपंढरी म्हणून ओळखले जाणार्या तीर्थक्षेत्र घोराड येथून पंढरपूरपर्यंत पायदळ प्रवास करणारी संत केजाजी महाराज पायदळ दिंडी २६ रोजी प्रस्थान करणार असल्याने वारकर्यांना आतापासूनच आषाढी वारीचे वेध लागल्याचे पाहायला मिळत आहे.
Saint Kejaji Maharaj's Dindi हरिदास महाराज महाकाळकर यांनी आठ वर्षांपूर्वी घोराड येथून पायदळ दिंडी सुरू केली. या दिंडीचे हे नववे वर्ष आहे. या दिंडीचे विणेकरी वसंत तडस असून चोफदार धनराज झाडे आहे. या दिंडीत सहभागी होणार्या वारकर्यांनी आपली नावे नोंदविली असून दिंडीच्या तयारीला प्रमुख दिंडीचालक लागले आहे. एक महिन्याचा हा पायदळ प्रवास असून २६ जून ते २३ जुलै असा राहणार असून यानंतर ७ दिवस पंढरपूर येथे ही दिंडी मुकामाला राहणार आहे. या दिंडीचा मुकाम पंढरपूर येथे संत केजाजी महाराज मठ शेगाव धुमाला येथे राहणार आहे. या दिंडीचे आयोजन संत केजाजी नामदेव महाराज चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे. पायदळ वारीमध्ये निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंदिर व शाळेमध्ये केली जाणार असून दिंडीतील वारकर्यांना भोजनाची व्यवस्था अन्नदात्यांनी केली आहे.
असा राहणार दिंडीचा पायदळ प्रवास
ही पायदळ दिंडी घोराड येथून निघणार असून ती सेलू, पवनार मार्गे जाणार आहे. दिंडीचा पहिला रात्रीचा मुकाम घोराड येथील भवानी मंदिरात राहणार आहे तर दुसर्या दिवशी सावंगी येथील हनुमान मंदिरात राहणार आहे. यानंतर रात्रीचे मुकामाचे ठिकाण रत्नापूर, कळंब, यवतमाळ, निवल हिवरी, आर्णी, दही सावळी, गुंज, काकड दाती, शेंबाळ पिंपरी, माळेगाव फाटा, हिंगोली, औंढा, आडगाव, परभणी, पोखर्णी, गंगाखेड, परळी, वरवटी फाटा, दिगुळ आंबा, माळेगाव, परतापूर, पाथरी, बार्शी, वडशिंगी, शेटफळ व २३ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे.