काँग्रेसकडून शैलेंद्र अग्रवाल आज भरणार नामांकन

    दिनांक :31-May-2026
Total Views |
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधानपरिषद मतदार संघ

चंद्रपूर, 
Shailendra Agarwal महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, काँग्रेसचे शैलेंद्र अग्रवाल सोमवार, 1 जून रोजी चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालात चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदार संघासाठी नामांकन अर्ज सादर करणार आहेत. यावेळी काँग्रेसचे विधी मंडळ पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते, पदाधिकारी यांची उपस्थिती असेल.
 
 
Shailendra Agarwal
 
Shailendra Agarwal  दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी संवाद साधणे, पक्ष संघटन अधिक मजबूत करणे तसेच महाविकास आघाडीतील समन्वय दृढ करण्याच्या दृष्टीने विशेष चर्चा आणि संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांतील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदार यांच्याशी संवाद साधून निवडणुकीसाठी एकजूट मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती सुभाष धोटे यांनी दिली. या पृष्ठभूमीवर काँग्रेस तथा महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांतील पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी सोमवारी सकाळी 10.30 वाजता येथील जनता महाविद्यालयाजवळ उपस्थित राहावे, असे आवाहनही धोटे यांनी दिले आहे.