अहिल्यानगर
Ahilyanagar road accident अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी–नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल 15 जण जखमी झाले आहेत. शिर्डी जवळील सावळीविहीर परिसरात ही दुर्घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून शिर्डीकडे जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आणि नाशिककडे जाणारी एर्टिगा कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला, तर बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अपघातानंतर काही क्षणांतच घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आणि जखमींना वाहनांमधून बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने शिर्डी येथील साई संस्थानच्या अतिविशेष रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत Ahilyanagar road accident आहे.अपघाताच्या तीव्रतेवरून कार वेगात असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र नंतर ती सुरळीत करण्यात आली.दरम्यान, अशा अपघातांमध्ये वाढ होत असल्याने वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि निष्काळजीपणे वाहन चालवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.