शेतकरी चिंतेत
समुद्रपूर,
Shortage of DAP Fertilizer खरीप हंगामाची सुरूवात होताच शेतकर्यांची बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी लगबग वाढली आहे. अनेक भागांत पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, अशा महत्त्वाच्या काळात जिल्ह्यात डीएपी खताचा तुटवडा निर्माण झाला असून युरिया खताचाही पुरवठा अपुरा पडत असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. खतांची उपलब्धता वेळेत न झाल्यास खरीप हंगामावर विपरित परिणाम होण्याची शयता व्यत केली जात आहे.
यंदाच्या हंगामात अद्याप डीएपी खताची रॅक पोहोचलेली नाही. परिणामी, अनेक कृषी केंद्रांवर डीएपी खत उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. शेतकर्यांकडून डीएपीला मोठी मागणी असताना पुरवठा होत नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. सध्या बाजारात डीएपी खताची किंमत सुमारे १ हजार ३५० रुपये प्रति पोते इतकी आहे. मात्र, या दरातही शेतकर्यांना आवश्यक प्रमाणात खत मिळत नसल्याने अडचण वाढली आहे. दुसरीकडे युरिया खताचा पुरवठाही मर्यादित असल्याने अनेक ठिकाणी शेतकर्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
Shortage of DAP Fertilizer पावसाळ्यापूर्वी अनेक शेतकरी पेरणीपूर्वीच खते खरेदी करून शेतात साठवून ठेवण्यास प्राधान्य देतात. मात्र, बाजारात डीएपी आणि युरिया सहज उपलब्ध नसल्याने शेतकर्यांना अतिरित आर्थिक व मानसिक तणाव सहन करावा लागत आहे. वेळेवर खतांचा पुरवठा न झाल्यास पिकांच्या वाढीवर तसेच उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यत होत आहे. खतांची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शासनाने राखीव कोट्यातील डीएपी व युरिया खताचा तातडीने पुरवठा करावा, अशी मागणी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत, विलास नवघरे, किशोर नेवल, मुरलीधर चौधरी, कीर्ती सवाई, सचिन गावंडे, राजू नौकरकर आदींनी केली आहे