मंगळवारी मृत्यूचे पंचक झाले पूर्ण!

    दिनांक :31-May-2026
Total Views |
तब्बल ६४ वर्षानंतर जुळला योग
 
सिंदी (रेल्वे), 
Sindi (Railway): Incident इतिहासाची पुनरावृत्ती कधी तरी होते म्हणतात ते खरेच असल्याचा दाखला मंगळवार २६ रोजी येथील नागरिकांनी अनुभवला. या दिवशी परंपरेनुसार अवघ्या २४ तासात पाच जणांना स्वर्गात प्रवेश करता आला. हा योग तब्बल ६४ वर्षांनंतर जुळून आला, हे विशेष!
 
 
panchak
 
Sindi (Railway): Incident  सन १९६२ च्या मे महिन्यात सेलडोह आणि खडकीच्या दरम्यान एका बैलबंडी व ट्रकच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. एक घटनास्थळीच तर दोन भावंडांचा स्थानिक रुग्णालयात उपचाराअभावी मृत्यू झाला होता. ते तिघेही परमिटवर सागवान फाटे घेऊन येताना ही घटना घडली होती. त्या तिघांच्या मृत्यूची चर्चा सुरू असतानाच हरदुलालपुरा भागात राहणारी ३२ वर्षीय महिला तोल गेल्याने विहिरीत पडून मरण पावली होती. या वृत्ताची चर्चा थांबत नाही तोच एका शाळकरी मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. मंगळवारी सुद्धा एक पुरुष आणि चार महिलांना अवघ्या २४ तासात अधिक मासात स्वर्गाच्या नंदनवनात प्रवेश मिळाला. २ मे १९६४ रोजी पुलगाव शहरात अवघ्या १८ तासात पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यात घुबडटोलीतील दोन महिलांचा समावेश होता, हे येथे उल्लेखनीय!