पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून विकासकामे करावी : उपेंद्र कोठेकर

    दिनांक :31-May-2026
Total Views |
पंडीत दिनदयाल उपाध्याय महाशिबिराचा समारोप

बुलढाणा, 
Upendra Kothekar जिवनात अभ्यास, उजळणी, पारायण केल्याने कार्यकर्त्यांचा विकास होतो. प्रत्येकाने पारिवारीक सबंध कायम ठेऊन सुख दुखात गेले पाहिजे प्रत्येक व्यक्ती कुटुंब गावांशी सबंध जोडले गेले तर शुन्यातून विश्व निर्माण होते. जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांनी अंत्यत प्रतिकुल परिस्थीत बैलगाडीतून प्रवास करून त्यांच्या मेहनतीने पक्ष संघटन वाढविले आब्ंयाचे झाड त्यांनी लावले फळ आपण खात आहे. ही जाणीव ठेऊन पक्षकार्य केले पाहिजे. पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संंवाद साधून जनतेची विकासकामे करावी असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष उपेंद्र कोठेकर यांनी कले.
 
 

upe
 
पंडीत दिनदयाल उपाध्याय महाशिबिर अभियानाचा समारोप दि. ३१ मे रोजी दुपारी बुलढाणा अर्बन रेसेडेन्सी येथे पार पडला. यावेळी व्याासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंद, आ. श्वेता महाले, नगराध्यक्ष पंडीतराव देशमुख, माजी जिलहध्यक्ष डॉ. गणेश मांटे, संतोष देशमुख, सरचिटणी दत्ता पाटील उपस्थित होते. उपेंद्र कोठेकर यांनी सांगितले या राज्यात पक्षाच्या सुरवातीला दोनच खासदार होते बुलढाणा व भंडारा पक्षाला आधार परिचय देऊन नावलौकिक कौतुक करणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्यांची राज्यात प्रसिद्धी होती. बुथपासून केंद्रिय कार्यकारणीचे प्रशिक्षण व्हावे या दृष्टीने पक्षाने व्यापक अभियान सुरु करून ८० टक्के कार्यकर्ते प्रशिक्षीत केले आहे. जनसंघापासून सुरु झालेला हा प्रवास कार्यपद्धतीचा एक भाग आहे. देशात भाजप व कॅम्यूनिस्ट पार्टी हे दोनच पक्ष वैचारिक पक्षावर कार्यकर्त्यांना प्रशिक्षीत करतात इतर पक्ष नेत्यांच्या आधारावर कार्य करतात. नेतृत्व संपले तर पार्टी संपेल हा या मागचा मुळ उद्देश आहे.
 
 
Upendra Kothekar  विकसित कार्यकर्त्यांसोबत पक्षाचा विकास झाला पाहिजे राजकाराणात काय करायचे आपण कोठे आहोत पक्षाचा इतिहास कार्यकपद्धती बदलते स्वरूप प्रवास, संवाद बैठक आपण कोठे आहोत सात्यताने कार्यकर्त्यांचे एकत्रित करण केवळ भाजपात होते सामूहिक नेतृत्व विचार समाजातून चालणारा आपला पक्ष आहे. लोकशाही पद्धतीत कार्यकरणीला सर्वोच्च आधिकार आहे. कोअर समिती व्यवस्था सभाळते या प्रमााणे डॉक्टरच्या कॉपाऊंडरला रुग्णाची नस लवकर सापडते तशीच जनतेला काय हवे हे कार्यकर्त्यांना समाजात राऊन लगेच समाजतून संपर्काने कळते. जुन्या पिढीतील बुलढाणा जिल्ह्यातील स्व. अर्जूनराव वानखडे, भाऊसाहेब फुंडकर, साडूंजी जाधव, किसनलाल संचेती, पंजाबराव देशमुख, घनशामदास गांधी अशा अनेकांनी प्रतिकुल परिस्थितीत पक्षाचे संघटन केले. प्रत्येकाने प्रशिक्षण घेतांना आत्मावलोकन सिंहावलोकन करून दुरुस्ती प्रवासरचनेतील मार्गक्रमण करून जनतेच्या भेटीला गेले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
 
 
याप्रसंगी बोलतांना आ. श्वेता महाले यांनी देशभरात प्रत्येक राज्यात लोकमान्यता असलेला सत्ताकारणात सकारात्मक वातावरण असतांना सुद्धा बूथ पासून आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संघटनेची काय स्थिती आहे हे चिंतन केले पाहिजे महिला युवा ओबीसी अशा सात प्रकारच्या आघाड्याची काय स्थिती आहे. लोकापर्यंत केंद्र राज्यच्या योजना कार्यकर्त्यांमार्फत पोहचल्या का हे चिंतन केले पाहिजे असे त्यांनी आर्वजून सांगितले. भाजप नेते स्व. भाऊसाहेब फूंडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन प्रतिमेचे पूजन श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. आभारप्रदर्शन सरचिटणीस दत्ता पाटील यांनी केले. सुत्रसंचलन कृष्णा सपकाळ यांनी केले. राष्ट्रगीताने अभियानाची सांगता झाली. या अभियानाला सर्व आघाड्याचे प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.