पुसद,
Vidarbha Sahitya Sangh, Pusad विदर्भ साहित्य संघ, शाखा पुसदची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आमदार विजय चोंढीकर यांच्या घरी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी शाखाध्यक्ष माजी राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी होते. यावेळी नवीन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रारंभी विश्वमोहिनी शारदादेवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षण, साहित्य, संस्कृती, समाजकारण व राजकारण क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सचिव डॉ. उत्तम रुद्रवार यांनी गेल्या चार दशकांतील शाखेच्या कार्याचा आढावा घेत पुसदच्या समृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा गौरवपूर्ण इतिहास मांडला. यावेळी नव्या पदाधिकाèयांची पुढीलप्रमाणे सर्वानुमते निवड करण्यात आली.
Vidarbha Sahitya Sangh, Pusad अध्यक्ष : डॉ. गणेश पाटील, कार्याध्यक्ष : दीपक आसेगावकर, सचिव : सुधाकर ठाकरे, कोषाध्यक्ष : प्रा. गोविंद फुके, सहसचिव : उत्तम जाधव, प्रसिद्धी प्रमुख : प्रा. दिनकर गुल्हाने, सदस्य : पंजाब सुरोशे, स्वप्निल चिंतामणी, अनिल वायकोस, प्रा. डॉ. रवी चापके आणि विंदा पाटील. यावेळी विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय अध्यक्षपदी बहुमताने निवड झालेल्या डॉ. गिरीश गांधी यांचे अभिनंदन करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दीर्घकाळ साहित्य, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्याला दिशा देणारे डॉ. हिराणी, विजय चोंढीकर, दीपक आसेगावकर आणि डॉ. उत्तम रुद्रवार यांचा नवनिर्वाचित पदाधिकाèयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नंतर मावळत्या पदाधिकाèयांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पुसदमध्ये साहित्य चळवळीला गतिमान करण्याचा मनोदय नवनिर्वाचित अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश पाटील यांनी व्यक्त केला. सचिव सुधाकर ठाकरे यांनी आभार मानले.