Wardha Bus Stand बसने प्रवास करणार्या सेलू येथे येणार्या व येथून जाणार्या प्रवाशांनी घाबरण्याचे कारण नाही. यवतमाळ, वर्धा व नागपूर मार्गावर धावणार्या सर्वच जलद बसेसना सेलू बस स्थानकावर थांबा दिला आहे. मात्र, वर्धा बस स्थानकावर लावलेल्या फलकाकडे काही वाहकाची वक‘दृष्टी का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना मात्र काही बसेस या बस स्थानकावर येतच नसल्याचा कटू अनुभव प्रवाश्यांना येत आहे. त्यामुळे बहुतांश प्रवाशी खाजगी वाहनांचा आधार घेत आहे.
वर्धा किंवा नागपूर येथून आवागमन करणार्या प्रवाश्यांना बसमध्ये शिरताना बसचा वाहक सेलू येथे बस थांबणार नाही, सेलू येथील प्रवाशांनी बसमध्ये बसू नये, असे सांगितल्या जाते. तर प्रवाशी बसमध्ये जबरदस्तीने बसले असेल तर त्यांना सेलू येथील दूरवर असणार्या बायपासवर उतरवल्या जाते. असे प्रकार अनेकदा घडले असून आताही प्रवाश्यांना बस वाहकाच्या मनमानीला सामोरे जावे लागते. असे प्रकार वाहकाकडून घडतात कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्धा बसस्थानकावर उपमहाव्यवस्थापक व वर्धा आगार प्रमुख यांनी या फलकावर स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे. बुट्टीबोरी मार्गे धावणार्या सर्व जलद बसेसला सेलू येथे थांबा देण्यात आला आहे. मग हा फलक या मार्गावर धावणार्या बसेसचे वाहक व चालक पाहत नाही का, हा संशोधनाचा विषय बनला आहे. याच फलकावर देवळी, केळझर येथेही बसेस थांबणार असल्याचे नमूद आहे. मग वाहक प्रवाश्यांना विनाकारण त्रास का देतात, हे कळण्यास मार्ग नाही.
घाबरू नका तक्रार करा
Wardha Bus Stand वर्धा व नागपूर येथून सेलूकरिता येणार्या प्रवाश्यांना वाहकाने सेलू येथे बस थांबणार नाही असे म्हटल्यावर त्याच बस स्थानकावर त्या वाहनाच्या क‘मांक व वेळ पाहून प्रवाशांनी तक‘ार करावी, बस वाहकाने बायपासवर उतरवून देण्याचा प्रयत्न केला तर उतरू नका त्यांना वर्धा बस स्थानकावर असलेल्या फलक वाचायला सांगा, असे आवाहन प्रवाशी मित्र मंडळाने केले आहे.