जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

    दिनांक :31-May-2026
Total Views |
मानोरा, 
Water Conservation Minister Sanjay Rathod मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे पोहरादेवी येथे आगमन झाले असता, त्यांना स्थानिक पदाधिकारी आणि शेतकर्‍यांच्या वतीने विवीध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी धावंडा येथील प्रलंबित लघु पाटबंधारे प्रकल्पाचा प्रश्न मांडण्यात आला. या योजनेचे सर्वेक्षण २००८-९ मध्ये पूर्ण झाले असून, या प्रकल्पाची सिंचन क्षमता १५०२ हेक्टर आहे. सदर काम ६०० हेक्टरच्या वरील सिंचन क्षमतेचे असल्याने ते जलसंपदा विभागामार्फत होणे आवश्यक आहे.
 
 
Sanjay Rathod
 
Water Conservation Minister Sanjay Rathod  त्यामुळे मृद व जलसंधारण विभागाने या कामाला सुरुवात करुण शेतकर्‍यांना जमीन ओलीत करण्यासाठी त्वरित पाणी उपलब्ध करून द्यावे, सन २३ मध्ये मौजे धावडा येथे बाधलेल्या कोल्हापुरी बंधारा मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे गाळला गेला असून, या कोल्हापुरी बंधार्‍यातील गाळाचा उपसा करुण नाला खोलीकरण व सरळीकरण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पोहरादेवी तीर्थक्षेत्री येणारे भाविक, स्थानिक नागरिक, पशुधन आणि शेतकर्‍यांच्या सिंचनासाठी या बंधार्‍याचे पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे धावंडा ते मौजा वडगाव दरम्यानच्या अंदाजे ३ कि.मी. नाल्याचे खोलीकरण व गाळ उपसा तातडीने करण्याची मागणी शेकडो शेतकर्‍यांच्या वतीने विजय पाटील, गजानन राऊत व घांवडा येथील शेतकरी यांनी केली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागांना तातडीने आदेश देण्याचे आश्वासन मंत्री संजय राठोड यांनी दिले. यावेळी विनोद राठोड, तुकाराम राठोड, रमेश ढोके, उदयसिंग राठोड, श्रीराम तडसे, रमेश पवार, नंदू वावडे, सुरेश जाधव, गजानन भालेराव, मांगीलाल राठोड, दिलीप खुशांडे, सुभाष पडेल, शक्ती राठोड, राजीव मस्के, प्रशांत राठोड, जोत्स्ना मस्के, सुषमा हरसुले व उपस्थित होते.