सावली,
Wild elephants enter Savli taluka गडचिरोली जिल्ह्यातून वैनगंगा नदीकाठाने सावली तालुक्यात 20 रानटी हत्तीचा कळप दाखल झाला आहे. वैनगंगा नदीच्या सिमावर्ती भागातील करोली, आकापुर ,खानाबाद आणि सायखेडा आदी गावांत त्यांचा वावर असल्याने परीसरातील नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्तींचा कळपात २० हत्तीचा समावेश आहे.
वनविभागाच्या वतीने विशेष लक्ष ठेवले जात असून, त्यासाठी दोन ड्रोन कॅमेराचा वापर केला जात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० पेक्षा अधिक वन कर्मचारी या रानटी हत्तींच्या कळपावर लक्ष ठेवले आहेत. त्यांना परत गडचिरोली जिल्ह्यात पाठविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हत्तींच्या कळपाबाबत वनविभागाने विशेष सुचना दिल्या आहेत. त्यात हत्तींचा फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी त्यांच्याजवळ जाऊ नये, सुरक्षित अंतर राखावे तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाच्या सूचना पाळावे व वनविभागास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.