वादळाचा तडाखा; सोलर पॅनल उडाले

शेतकर्‍याचे २.७० लाखांचे नुकसान

    दिनांक :04-May-2026
Total Views |
सेलू
Selu news तालुयातील जोगापूर शेत सर्वे ४९/४ येथील शेतकरी शत्रुघ्न हजारे यांच्या शेतातील सोलर प्रकल्पाला अचानक आलेल्या वादळी वार्‍याचा मोठा फटका बसला आहे. वार्‍यामुळे शेतात बसविण्यात आलेले एव्हीएल कंपनीचे सोलर पॅनल उडून गेले. या घटनेत सोलर पॅनलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अंदाजे २ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.
 
selu news 
Selu news अचानक आलेल्या या वादळी वार्‍यामुळे परिसरातील इतर ठिकाणीही किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सोलर प्रकल्प उभारणी करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पृष्ठभूमीवर सोलर कंपनीने शेतकर्‍याचे झालेले नुकसान लक्षात घेऊन तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.