वर्धा
Wardha news वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा रविवार ३ रोजी वर्धा शहरात शांततेत पार पडली. जिल्ह्यात सहा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपेकी १ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर ३८ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले.

Wardha news नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी वर्धा जिल्ह्यात चोख नियोजन करण्यात आले होते. शहरातील शिक्षण संस्थांमध्ये परीक्षा केंद्रांवर दुपारी २ ते ५ या वेळेत ही परीक्षा पार पडली. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आणि केंद्रावरील निरीक्षकांच्या देखरेखीत कोणतीही अनुचित घटना न घडता ही परीक्षा सुरळीत पार पडली. आता या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. Wardha news परीक्षेची पारदर्शकता टिकवण्यासाठी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात होती. विद्यार्थ्यांची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. पेन, घड्याळ, दागिने किंवा कोणत्याही इलेट्रॉनिक उपकरणांवर बंदी घालण्यात आली होती. ड्रेस कोडचे पालन करणेही अनिवार्य होते.