वर्धा,
dhamdhwaj स्थानिक जुनी म्हाडा कॉलनी येथील जय पवनसुतनगरातील श्रीराम श्री हनुमान मंदिरात ५१ फूट उंच धर्मध्वजाची विधिवत स्थापना करण्यात आली. मंदिर परिसर ‘जय श्रीराम’ व ‘जय हनुमान’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. या मंदिराच्या वतीने अयोध्या येथे महाराष्ट्रातील रामभतांकरिता भत निवास बांधण्याचे काम सुरू आहे. या मंदिराच्या वतीने वाचनालयासारखे विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात येत आहेत.
जय पवनसुत हनुमान मंदिर ट्रस्टतर्फे पवनसुतनगर येथील मंदिरात विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात. ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत राठी यांनी मंदिर परिसरात ५१ फूट धर्मध्वज उभारण्याचा मनोदय व्यत केला होता. यानंतर ट्रस्टच्या अध्यक्ष शारदा फरताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, सदस्य व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने धर्मध्वजाचे काम हाती घेण्यात आले.dhamdhwaj ५१ फूट धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत राठी तसेच नवदाम्पत्य पवन व प्रतिमा काकडे यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
५१ फूट उंच धर्मध्वज वर्धेतील पहिला धर्मध्वज ठरला आहे़ यावेळी अशोक फरताडे, नरेश झाडे, शंकर चन्ने, संजय कराळे, अजय कहाते, याज्ञीक बोकडे, नरेश पराले, प्रितम वानखेडे तसेच परिसरातील भाविक भत मोठ्या संख्येने उपस्थित होते.