अयोध्येचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!

जालौनमध्ये भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू

    दिनांक :04-May-2026
Total Views |
जालौन,
accident in Jalaun अयोध्येचे दर्शन घेऊन अत्यंत आनंदाने घरी परतणाऱ्या भाविकांसाठी सोमवारची सकाळ काळ बनून आली. उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील ओराई येथे एका वेगवान टवेरा कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ८ भाविकांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत भाविक हे ललितपूर जिल्ह्यातील महरोनी येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
 
 
accident in Jalaun
 
​हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि प्रवासी आतमध्ये अडकून पडले. कालपी कोतवालीचे पोलीस आणि बचाव पथकाने क्रेनच्या साहाय्याने कार कापून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. प्राथमिक तपासानुसार, कार चालकाला पहाटेच्या वेळी डुलकी लागल्यामुळे गाडीवरील ताबा सुटला आणि ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. accident in Jalaun या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांनी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्राण सोडले.
 
 
​अपघाताची माहिती मिळताच महरोनी परिसरात शोककळा पसरली आहे. शशिकांत तिवारी, कृष्णकांत, दीपक तिवारी यांच्यासह आठ जणांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. accident in Jalaun सध्या जखमींवर ओराई येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.