गुरुवारी गडचिरोलीत ‘मोगरा फुलला’ चा सुरेल सोहळा

    दिनांक :04-May-2026
Total Views |
गडचिरोली,
mogra phulla in gadchiroli संत ज्ञानेश्‍वर महाराजाच्या 750 व्या जन्मवर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने गुरुवारी, 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजता येथील गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन सभागृहात ‘मोगरा फुलला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 

mogra phulla in gadchiroli 
 
 
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकारातून राज्यभर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या जीवनकार्याचा जागर केला जात असून, या उपक्रमाचा एक भाग म्हणून गडचिरोलीत ‘मोगरा फुलला’ हा संगीतमय कार्यक्रम सादर होत आहे. या कार्यक्रमात व्याख्याते गणेश शिंदे हे संतांच्या जीवनकार्याचा वेध घेणार आहेत, गायिका सन्मिता शिंदे आपल्या सुरेल आवाजात अभंग आणि भावगीतांची प्रस्तूती करून वातावरण भक्तीमय करणार आहेत. आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या आणि तंत्रज्ञानप्रधान जीवनशैलीत माणूस आपल्या सांस्कृतिक व आध्यात्मिक मुळापासून दूर जात असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत ‘मोगरा फुलला’ सारखे कार्यक्रम समाजाला समतेचा, बंधूभावाचा आणि एकात्मतेचा संदेश देत सकारात्मकतेची दिशा दाखवतात.
संत ज्ञानेश्‍वरी महाराजांचे विचार आजच्या काळात अधिकच प्रेरणादायी ठरतात. तसेच, आधुनिकतेच्या प्रभावामुळे पारंपारिक संत साहित्यांपासून दुर जात असलेल्या तरूण पिढीपर्यंत हे विचार पोहोचविण्याचे कार्य अशा कार्यक्रमांद्वारे प्रभाविपणे केले जाते.mogra phulla in gadchiroli या प्रेरणादायी आणि सुरेल कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी गडचिरोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.