पुणे
raped in Nasrapur पुण्यातील नसरापूरमध्ये एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. 65 वर्षाच्या व्यक्तीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला मारून टाका, त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारा, अशी संतप्त प्रतिक्रिया आरोपीच्या पत्नीने दिली आहे.
घटना घडल्यापासून मी अन्नपाणी घेत नाही. त्या बाळाचा आत्मा काय म्हणाला असेल? त्या बाळाच्या घरच्यांना, तिच्या आईला काय वाटत असेल? मी पण कुणाची तरी आईच आहे. आमचा आरोपीशी 10 वर्षापासून त्याचा संपर्क नाही. तो घरी राहत नाही. आम्ही दोघेच मायलेकर राहतो. 10 वर्षात त्याला आम्ही घरी बोलावण्याचा प्रयत्न केला. पण तो म्हणाला तुझे तू बघ, असे आरोपीची पत्नी म्हणाली.
आरोपीच्या मुलानेही प्रतिक्रिया व्यक्त केली. तो माझा बाप आहे हीच माझी चुकी आहे. त्याने चिमूरड्यावर केलेल्या अत्याचाराचा मी जाहीर निषेध करतो. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा करा, असे मी सरकारला आवाहन करतो. मी त्याचा मुलगा आहे हे माझे मोठे दुर्दैव आहे. त्या चिमुरडीला जेवढ्या वेदना झाल्या तेवढ्या वेदना ह्याला झाल्या पाहिजेत. याला लोकांच्या हवाली केले पाहिजे आणि ठेचून मारला पाहिजे . त्याने स्वतःच्या पुतणीवर अत्याचार केला तेव्हा मी नववीत होतो. तेव्हा मला समज होती. तेव्हा आम्हाला घरदार सोडून जावे लागले . त्यानंतर मला बाप म्हणजे काय माहितीच नाही. त्याच्यासोबत संबंध संपवला होता. आज माझ्या सात बहिणी आहेत, आई आहे. आम्ही न्याय कुणाला मागायचा? जे कृत्य माझ्या वडिलांनी केले त्याचा दोष कुटुंबाला देणे चुकीचे . सरकारला विनंती आहे की, चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा. चिमुरडीला इतक्या क्रूरतेने मारले .
७मे पर्यंत पोलीस कोठडी
भोर तालुक्यातील नसरापूर येथील चार raped in Nasrapur वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निघृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला पुणे न्यायालयाने ७मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.
या पथकात पुणे ग्रामीण पोलिसांमधील सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. जनक्षोभइतका तीव्र होता की, शनिवारी संतप्त नागरिकांनी पुणे येथील नवले पूल परिसरात रास्ता रोको आंदोलन करत बंद पाळला होता. नागरिकांच्या भावना आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. एसआयटीमार्फत पुराव्यांची साखळी भक्कम करून आरोपीला कठोर कायदेशीर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.