दिग्रसला विद्युत कार्यालयात सर्वपक्षीय धडक

वारंवार वीज बंदसाठी अखेरची सूचना

    दिनांक :04-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस,
digras-electricity-office : दिवसभरात चार-चार वीज बंदने वैतागलेल्या लोकांच्या तक्रारीला घेऊन भारतीय जनाता पार्टीसोबत सर्वच पक्षांनी येथील विद्युत वितरण कार्यालय अभियंता व कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले. लोकांना विनाकारण त्रास देणे टाळा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सोमवार, 4 मे रोजी देण्यात आला.
 

y4May-Dhadak 
 
 
 
दरमहा वेळेवर वीज बिल भरणाèया विद्युत ग्राहकांना पूर्वसूचना न देता वीज बंद करणे, तक्रारीचा फोन न उचलणे व उडवाउडवीची उत्तरे देणे यावरही कळस म्हणजे पठाणी वसुली करणाèया येथील महावितरण कार्यालयात जाऊन गेल्या सोमवारी भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे यांनी समज दिली होती.
 
 
त्यावेळी त्यांनी लोकांना होणारा त्रास कमी करा, तांत्रिक अडचण असल्यास कळवा, अशा सौम्य भाषेत सूचना दिल्या होत्या. सोबत आठवडाभराची मुदत देत लोकांना दिलासा देण्याची विनंती केली होती. मात्र आठवड्यानंतरच्या या सोमवारी भाजपाबरोबरच सर्वच पक्षांच्या पदाधिकाèयांसह कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाला धडक देऊन चांगलाच समाचार घेतला.
 
 
भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे, शिवसेनेचे नगरसेवक बाळू जाधव, उबाठा शिवसेना शहर प्रमुख राहुल देशपांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरबाज धारीवाला, नगरसेवक स्वाती धावडे, नगरसेवक कविता सुकळकर यांच्या पुढाकारात विद्युत वितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत वाणी आणि सहायक अभियंता सुरेंद्र वैष्णव यांची चांगलीच कानउघाडणी केली.
 
 
यावेळी उपस्थित प्रश्नांचे निरसन न करणाèया या विद्युत कार्यालयाच्या कारभाèयांची बोलती बंद करण्यात आली. कारण हे दोघेजण गेल्या आठ दिवसांपासून रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र वीज बंद होणार नाही याकडे लक्ष देऊ, असा विश्वास सर्वपक्षीय पदाधिकाèयांना सुरेंद्र वैष्णव यांनी दिला.
 
 
तरीही आता विनाकारण वीजलाईन बंद करून त्रास दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत विद्युत वितरण कार्यालयाच्या या अभियंत्यांची चांगलीच सर्वपक्षीय कानउघाडणी करण्यात आली.