अनिल कांबळे,
नागपूर,
sbl-blast : काटाेल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुर्गा गाडगे असे मृत महिलेचे नाव आहे. तब्बल दाेन महिन्यांच्या उपचारानंतर दुर्गा यांचा मृत्यू झाला.
राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दुर्गा यांच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू हाेते. मात्र, साेमवारी त्यांचा मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष अपयशी ठरला. या निधनामुळे एसबीएल स्फोटातील एकूण मृतांची संख्या आता 26 वर पाेहचली आहे. या रुग्णालयात 3 जखमींवर सध्या उपचार सुरु आहे. 1 मार्चला झालेल्या स्फोटात पहिल्याच दिवशी 18 कामगार ठार झाले हाेते तर 22 जण गंभीर जखमी झाले हाेते. उपचारादरम्यान काही जणांचा मृत्यू झाला.