तभा वृत्तसेवा
आर्णी,
dies-in-his-own-shop : सुर्वे पाटील झेरॉक्स अॅन्ड कॉम्प्युटर दुकानात रविवार, 3 मे रोजी संध्याकाळी 6 च्या दरम्यान महादेव ज्ञानदेव सुर्वे (वय 51) हे मृतावस्थेत आढळून झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र मृत्यू कशाने झाला याचे कारण कळू शकले नाही.
मृतकाचे मोठे भाऊ यशवंत सुर्वे यांनी आर्णी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आर्णीतील शिवनेरी चौकातील या दुकानात महादेव सुर्वे हे पडून होते. नातेवाईकांनी प्राथमिक उपचार करण्यासाठी त्यांना आर्णी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
मृतक महादेव सुर्वे हे दिग्रसचे पत्रकार यशवंत सुर्वे यांचे लहान बंधू होते. हा मृत्यू ऊन लागल्याने झाला की इतर कशाने, याचे कारण शवविच्छेदन अहवालात स्पष्ट होईल. या घटनेचा तपास जमादार नफीस शेख व हृषीकेश इंगळे करीत आहेत.