बारामती विधानसभा निवडणुकीत बिचकुलेची अब्रुच निघाली

पहिल्या फेरीत अवघी 7 मते

    दिनांक :04-May-2026
Total Views |
पुणे,
Baramati bypoll election पुणे जिल्ह्यातील अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून त्या निर्णायक विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच स्पष्ट झालेल्या या कलामुळे बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
 

Baramati bypoll election 
मतमोजणी केंद्रावर मिळालेल्या प्राथमिक कलांनुसार सुनेत्रा पवार यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे अपक्ष आणि इतर उमेदवारांमध्ये अभिजीत बिचुकले, करुणा मुंडे तसेच इतर उमेदवार मागे पडले असून त्यांना अत्यल्प मते मिळत असल्याचे चित्र आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर सुनेत्रा पवारांची आघाडी वाढत असल्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बारामती मतदारसंघ Baramati bypoll election हा राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. या पोटनिवडणुकीतही त्या परंपरेची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसत आहे. मतदानानंतर जाहीर झालेल्या सुरुवातीच्या कलांमध्येच सुनेत्रा पवारांनी मजबूत पकड घेतल्याने राजकीय विश्लेषकांनी या निकालाला विशेष महत्त्व दिले आहे.दरम्यान, मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला असून ढोल-ताशांच्या गजरात वातावरण दणाणून गेले आहे. निकालाचा कल स्पष्ट होताच समर्थकांनी विजयाची खात्री व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रशासनाकडून अधिकृत अंतिम घोषणा अद्याप बाकी असून मतमोजणी प्रक्रिया सुरूच आहे.या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून बारामतीतील हा निकाल राज्यातील आगामी राजकीय समीकरणांवरही प्रभाव टाकू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.