विकासाच्या राजकारणावर श्रद्धा आणि सुशासनाची अपेक्षा

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

    दिनांक :04-May-2026
Total Views |
यवतमाळ,
ashok-uike : बंगालमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या भव्य यशाबद्दल मी राज्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. हा विजय म्हणजे जनतेने दिलेला विश्वास, विकासाच्या राजकारणावर ठेवलेली श्रद्धा आणि सुशासनाची अपेक्षा यांचे प्रतीक आहे, अशी भावना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केली.
 
 
 
y4May-Ashok-Uike
 
 
 
या ऐतिहासिक विजयामुळे बंगालमध्ये विकासाची नवी दिशा मिळेल, असा मला ठाम विश्वास आहे. भाजपाने नेहमीच ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या तत्त्वावर कार्य केले असून, यापुढेही त्याच ध्येयाने राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
 
 
आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोेचविण्यावर भर दिला जाईल. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पायाभूत सुविधा यामध्ये विशेष लक्ष देऊन सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. मी बंगालमधील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनतेचे अभिनंदन करतो. त्यांच्या परिश्रमांमुळेच हा विजय शक्य झाला आहे. आपण सर्व मिळून एक सक्षम, समृद्ध आणि विकसित बंगाल राज्य घडवूया, असेही मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले.