अकोला,
fake census applications भारत जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत असल्याचे जिल्हा प्रशासना कडून कळविण्यात आले.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे. स्व नोंदणी - नागरिक https://se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला एस इ आयडी' त्यानंतर येणाऱ्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल. याशिवाय १६ मे ते १४ जून या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल.fake census applications सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.