कोलकाता
BJP victory पश्चिम बंगालच्या राजकारणात 4 मे रोजी नवा इतिहास रचला गेला आहे. हुगळीच्या लाटांपासून तर दार्जिलिंगच्या पहाडांपर्यंत सध्या ‘जय श्रीराम’चा जयघोष दणाणत आहे. बंगालमधील ऐतिहासिक क्रांतीचे हे बिगूल आहे. पण, भाजपासाठी हा विजय केवळ निवडणूक म्हणून महत्त्वाचा नाही तर त्यांनी फार जुने ‘पितृऋण’ फेडले आहे.
BJP victory भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचे हे ऋण प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यावर होते. भाजपाचे पितामह समजले जाणारे श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर का होईना कमळ फुलले आहे.
BJP victory भाजपाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांच्या राज्यात अर्थात उत्तराखंड ते उत्तरप्रदेशात भाजपाने आधीच आपली सत्ता स्थापन केली आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत पक्षाला पाय रोवण्यास तब्बल 75 वर्षे अथक परिश्रम करावे लागले.