नवी दिल्ली,
jhalmudi पश्चिम बंगालमध्ये आज सत्ता पालट होतांना दिसतोय,मोदींनी प्रचारादरम्यान झालमुडीचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर झालमुडी सगळीकडे प्रसिद्ध झाली. चला तर मग आज जाणून घेऊया या विजयाच्या जल्लोषात झालमुडी कशी बनवायची.
साहित्य:
चीरमुरे: २-३ वाट्या (कुरकुरीत असावेत)
भाजलेले शेंगदाणे: २ चमचे
बारीक चिरलेला कांदा: १ मध्यम
बारीक चिरलेला टोमॅटो: १ छोटा
बारीक चिरलेली हिरवी मिरची: १-२ (तिखटानुसार)
उकडलेला बटाटा: १ (बारीक फोडी केलेला)
बारीक शेव किंवा फरसाण: अर्धी वाटी
कोथिंबीर: बारीक चिरलेली
लिंबाचा रस: १ चमचा
कच्चे मोहरीचे तेल: १ चमचा (यामुळेच खास चव येते)
मसाले:
काळे मीठ (Sanchal): चवीनुसार
लाल तिखट: पाव चमचा
चाट मसाला: अर्धा चमचा
भाजलेली जिरे पूड: अर्धा चमचा
कृती
एका मोठ्या बाऊलमध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, उकडलेला बटाटा आणि भाजलेले शेंगदाणे एकत्र करा.
आता त्यात काळे मीठ, लाल तिखट, चाट मसाला आणि जिरे पूड टाका.jhalmudi यात मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण व्यवस्थित चमच्याने मिक्स करा. (जर तुमच्याकडे कैरीच्या लोणच्याचा मसाला किंवा तेल असेल, तर ते घातल्याने चव अजून वाढते). सर्वात शेवटी कुरकुरीत चीरमुरे आणि बारीक शेव/फरसाण घालून पटकन हलवून घ्या.
वरून थोडी कोथिंबीर टाका आणि लगेच खायला द्या.