गोंदिया
Gondia news पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या देदीप्यमान यशाचा जल्लोष सोमवारी ४ मे रोजी गोंदिया जिल्ह्यातही पहावयास मिळाला. गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकासह विविध मंडळात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत एकच जल्लोष केला. व झालमुरीचे वाटप केले.
Gondia news पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीपूर्वीच व्यक्त केलेला विजयाचा विश्वास आणि हुकूमशाही नाकारत विकासाला कौल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दाखविलेला विश्वास लक्षात घेत बंगाल, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले. या विजयाचा जल्लोष केवळ या राज्यांपर्यतच न राहता संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातही हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. Gondia news याअनुषंगाने गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरासह सर्वच मंडळात भाजपा जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले यांच्या नेतृत्वात विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना झालमुरी वाटप करण्यात आले. प्रसंगी पं.स. सभापती मुनेश्वर रहांगडाले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल, भाजपा जिल्हा महामंत्री सुनिल केलनका, जयंत शुक्ला, गुड्डू चांदवानी, संजू कुळकर्णी, पुजा तिवारी, बबली चौधरी, शुभा बैस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.