तभा वृत्तसेवा
मारेगाव,
nawargaon-news : तालुक्यातील नवरगाव येथे एका 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह शेताजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करून कलम 194 बीएनएसप्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
मृतक पोमाबाई कवडू शिवरकर या नवरगावच्या रहिवासी आहे. त्या त्यांचा मुलगा सतीश शिवरकर याच्यासोबत राहत होत्या. त्या मानसिक आजाराने त्रस्त असल्याने वारंवार घराबाहेर निघून जात असत. तसेच गावात व शेत शिवारात भटकत असायच्या अशी माहिती आहे.
सोमवार, 27 एप्रिल 2026 रोजी त्या घरातून निघून गेल्या होत्या. परत न आल्याने मुलाने सगळीकडे शोध केला. परंतु त्या कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे दुसèया दिवशी मुलाने पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती. रविवार, 3 मे रोजी दुपारी 12 च्या सुमारास गावकèयांनी अनिल सोनमाले यांच्या शेताजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली.
त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह पोमाबाई शिवरकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सतीश शिवरकर यांनी कुणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहेत.