- जीवनाचा संघर्ष पुन्हा सुरु : जवळून बघितला मृत्यू
अनिल कांबळे
नागपूर,
Case in Dudhala village शेतमजुराशी लग्न झाल्यानंतर गरीबीतही नीटनेटका संसार केला. संसारवेलीवर दाेन मुली फुलांसारख्या उमलल्या. सर्व सुरळीत सुरु असताना पतीला कँसरसारख्या आजाराने ग्रासले. आर्थिक गणिते बिघडली आणि उपासमारीची वेळ आम्हावर आली. त्यामुळे कमरेला पदर खाेचून संसाराचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि राऊळगावातील एसबीएल स्फोट पदार्थाच्या कंपनीत कामाला लागली. पण नियतीच्या मनात काही वेगळेच हाेते. काही दिवसांपूर्वीच कंपनीत झालेल्या स्फोटात हात, पाय, मानेसह बरेच अंग भाजले गेले. जीवन-मृत्यूच्या संघर्षावर मात करीत काही दिवसांतच मी पूर्णपणे बरी हाेईल आणि पुन्हा माझ्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी मिळेल ते काम करण्यासाठी मी पुन्हा पायावर उभी राहील, अशी जिद्द उराशी बाळगणाèया मनिषा धुर्वे यांनी व्यक्त केली.
Case in Dudhala village काेंढाळीजवळील दुधाळा गावात राहणारे गणेश धुर्वे हे शेतमजुरी करायचेे. पत्नी मनिषा आणि खुशाली आणि माधुरी अशा दाेन मुलींसह संसाराचा गाडा हाकत हाेते. घरात अठराविश्व दारिद्र्य असल्यामुळे मुलींचे शिक्षण आणि घरखर्च भागत नसल्यामुळे गणेश यांनी साेलार कंपनीत कामाला लागले. घराची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि दाेन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागायला लागला. मात्र, या सुखी संसाराला कुणाचीतरी नजर लागली. गणेश यांना कँसरचे निदान झाले. त्यामुळे मनिषा पूर्णपणे खचल्या. पतीचा उपचार आणि दाेन्ही मुलीचे शिक्षण असा यक्षप्रश्न त्यांच्यासमाेर उभा हाेता. हातात पैसा नाही आणि पतीचा औषधाेपचाराचा खर्च भागवायचा हाेता. त्यात दाेन्ही मुलींचे शिक्षण थांबले. मनाने खचून गेलेल्या मनिषा यांनी हिम्मत बांधली आणि स्वतःच कामाच्या शाेधात भटकल्या. शेवटी त्यांना राऊळगावातील एसबीएल कंपनीत काम मिळाले. जेमतेम मिळणाèया पगारातून कँसरग्रस्त पतीचा उपचार आणि दाेन्ही मुलींचे शिक्षण नव्याने सुरु झाले. सलग दाेन वर्षे सुटी न घेता काम करीत मनिषा यांनी कुटुंब प्रमुख हाेऊन संसार नव्याने उभा केला.
नियतीने घेतली पुन्हा परीक्षा
अताेनात कष्ट करुन पदरी पडलेल्या पैशातून दाेन्ही मुली महाविद्यालयीन शिक्षण सुरु केले तर पतीचा उपचार सुरु झाला. सर्व काही सुरळीत असताना नियतीने पुन्हा परीक्षा घेतली. कंपनीत काम करीत असताना अचानक स्फोट झाला आणि त्यात जवळपास संपूर्ण शरीर भाजल्या गेले. बेशुद्धावस्थेत रुग्णालयात उपचार सुरु झाला. आठ दिवसांनंतर शुद्धीवर आल्यानंतर स्वतःचे शरीर बघितले आणि रडू काेसळले. काम करणारे हाेत आणि पटपट चालणारे पाय बरेच जळाले हाेते. कुटुंबाचा कणा पुन्हा निखळल्याची जाणिव झाली.
मिळेल ते काम करेल
जवळपास दाेन महिने उपचार घेतल्यानंतर मनिषा आता बरी झाली आहे. पाठीमागे वळून बघितल्यानंतर पुन्हा तिचा संसार विखूरल्याचे चित्र तिला दिसते आहे. त्यामुळे संसारासाठी आणि लेकरांच्या भविष्यासाठी मी पुन्हा लढेल. काबाडकष्ट करण्यासाठी पुन्हा सज्ज असेल. माझ्याने शक्य हाेईल तेवढे कष्ट उपसेल आणि पुन्हा एकदा संसार नीट उभा करेल, अशी प्रतिक्रिया मनिषा धुर्वे यांनी व्यक्त केली.
...जवळून अनुभवला मृत्यू
काम करीत असताना अचानक मशिनचा स्फोट झाला. त्यामध्ये माझ्याच युनिटमधील 10 ते 12 जण गंभीररित्या भाजल्या गेल्या. त्यापैकी तिघींचा काही वेळातच मृत्यू झाला. किंकाळ्या आणि वेदनेचे हुंदके ऐकायला येत हाेते. माझ्या शरीरावरील कातडे काळेकुट्ट दिसत हाेते. रक्ताचे ओघळ पायातून वाहत हाेते. त्यावेळी मी अगदी जवळून मृत्यू अनुभवला, असा थरारक प्रसंग पुन्हा एकदा मनिषा यांनी सांगितल्यामुळे अंगावर काटा उभा राहिला.