भाजपाच्या विजयाचा जल्लोष

-झालमुरीचे वितरण -फटाक्यांची आतषबाजी

    दिनांक :04-May-2026
Total Views |
अमरावती, 
celebration-of-bjps-victory : पश्चिम बंगाल, आसाम, पुड्डुचेरी येथील विजयाचा भाजपाच्या राजापेठ येथील कार्यालयात सांयकाळी मोठा जल्लोष करण्यात आला. बंगाल निवडणुकीची ओळख बनलेल्या झालमुरीचे वाटप करून आणि फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशाच्या निनादात विजयत्सोव साजरा करण्यात आला. विजयाच्या प्रचंड घोषणा यावेळी देण्यात आल्या.
 
 
AMT
 
भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, रविराज देशमुख, प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, रवींद्र खांडेकर, किरण पातुरकर, महिला मोर्चा अध्यक्ष सुधा तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या जल्लोषाला सुरूवात झाली. ढोलताशाचा निनाद सुरू होताच महिला व पुरूष कार्यकर्त्यांनी आनंदात थिरकणे सुरू केले. महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळून आंनदाला वाट मोकळी करून दिली. कार्यकर्त्यांनी कार्यालयातच तयार केलेल्या झालमुरीचे वितरण सर्वांना करण्यात आले. जल्लोष पाहण्यासाठी एकत्र आलेल्या नागरिकांना झालमुरी देण्यात आली. भाजपाचे ध्वज हातात घेऊन कार्यकर्त्यांनी विजयाचा प्रचंड जयघोष केल्याने परिसर दुमदुमून गेला होता. जहा जन्मे मुखर्जी वो बंगाल हमारा है, मोदी है तो मुनकीन है, भाजपाचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या जल्लोषात नगरसेवक संजय नरवणे, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, मिलिंद बांबल, बंडू हिवसे, राधा कुरील, पद्मजा कौंडण्य, सुरेखा लुंगारे, संजय तिरथकर, गंगा खारकर, तसेच सरचिटणीस बादल कुळकर्णी, सुमीत पवार, तसेच सदूभाऊ मुंशी, राजू कुरील, दिपक पोहेकर, सचिन रासने, सुनील खराटे, प्रणीत सोनी, भारत चिखलकर, राजेश पड्डा, राजेश आखेगांवकर, आकाश पाटील, सुनील तायडे, संगीता गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते.