तभा वृत्तसेवा
कळंब,
bike-set-on-fire : येथील तपेश्वर मैदान मार्गावर रविवारी रात्री 9 वाजता शाब्दिक वादातून दुचाकी पेटवून दिल्याची गंभीर घटना घडली.
या प्रकरणी सात युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे. एमएच29 सीके5087 या दुचाकीवरून दोन युवक घरी जात असताना काही युवकांनी त्यांना अडवले. गाडी का अडवली, अशी विचारणा केल्यावर शाब्दिक वाद झाला.
घटनास्थळी गर्दी जमून आरडाओरड झाल्याने दोन्ही युवक दुचाकी सोडून पळून गेले. संतप्त जमावाने दुचाकीला जागीच पेटवून दिले. त्यानंतर जमावातील काहींनी दुचाकीस्वारांचे घर गाठून घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी व दुसèया दुचाकीची तोडफोड केली.
माहिती मिळताच ठाणेदार राजेश राठोड, सहनिरीक्षक अमित जाधव, उपनिरीक्षक प्रमोद काळे, सागर भास्कर व महेंद्र साळवे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी रिनेश बैसाने यांनीही घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तपास करून काही युवकांना ताब्यात घेतले. एकजण फरार असून ठाणेदार राजेश राठोड अधिक तपास करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.