तभा वृत्तसेवा
दिग्रस,
nasrapur-case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या अमानवीय आणि क्रूर प्रवृत्तीचा सोमवार, 4 मे रोजी ‘आम्ही दिग्रसकर’ या संघटनेने निषेध व्यक्त केला.
प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल, यासाठी सरकारने सक्षम वकिलांची नियुक्ती करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महिला व बालसुरक्षा कायदे अधिक कडक करण्यात यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. ‘आम्ही दिग्रसकर’ संघटनेच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो. हे निवेदन आपल्या स्तरावरून तातडीने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवण्यात यावे असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
या प्रसंगी दिग्रस शहरातील सर्व पक्ष, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार व महिला ‘आम्ही दिग्रसकर’ या नावाखाली संघटित होऊन तहसील कार्यालयात मोठ्या संख्येत उपस्थित झाले होते. शेकडो सह्यांचे निवेदन तहसीलदार मयूर राऊत यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याना पाठविण्याची विनंती करण्यात आली.