बँड वाजवत भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

-धंतोली पक्ष कार्यालयात विजयी जल्लोष -वंदे मातरमचा उद्घोष करणार्‍यांच्या हातात सोपवली सत्ता

    दिनांक :04-May-2026
Total Views |
नागपूर,
west-bengal-election-results : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचा ’जंगलराज’ संपुष्टात आणला आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता पश्चिम बंगालमध्ये एका कणखर राष्ट्रवादी प्रशासनाची स्थापना होणार असल्याचा विश्वास भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
 

BJP 
 
 
 
ममता बॅनर्जीचा ’जंगलराज’ संपुष्टात: भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी
 
पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निकालानंतर धंतोलीच्या विभागीय कार्यालयासमोर दुपारी बँडबाजा वाजवित विजयी जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी दयाशंकर तिवारी माध्यम प्रतिनिधींसमोर विजयी मुद्रेत आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. विशेषतः पश्चिम बंगालसह इतर राज्यांत भाजपला चांगले यश मिळल्याने भाजपच्या नेत्यांनी धंतोलीसह इतर अनेक चौकाचौकात विजयी जल्लोष केला. तसेच शहरातील अनेक ठिकाणी फटाके फोडत मिठाईचे वाटप आले.
 
बँड वाजवत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव
 
 
भाजप पक्ष कार्यालयासह शहरातील भाजप अनेक कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. महाल, इतवारी, बडकस चौक,गांधीबाग, सीताबर्डी, रामनगर, गोकुळपेठ, धरमपेठ, लक्ष्मीनगर, वर्धा रोड, छत्रपती चौक, नरेंद्रनगर, जयप्रकाशनगर, गोपालनगर, जयताळा आदी भागात बँड वाजवत भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपच्या नगरसेवकांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयासमोर विजयाचा जल्लोष , जिलेबी वाटून केला.
 
वंदे मातरमचा उद्घोष करणार्‍यांच्या हातात सत्ता: संजय फांजे
 
पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये तीन राज्यात सर्वात मोठे यश मिळाले आहे. तर आसाममध्ये हॅटट्रिक झाल्याने आम्ही नागपुरात जल्लोष साजरा करीत असल्याची प्रतिक्रिया आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली. हा विजय काँग्रेसला धडा देणारा होय. या विजयानंतर देशभरात वातावरण असून नागपुरात कार्यकर्त्यांनी मोठया उत्साहात आनंद साजरा करीत आहे.
 
 
महान साहित्यकार बंकिमचंद्र यांच्या बंगालमध्ये ’वंदे मातरम’चा खर्‍या अर्थाने उद्घोष करणार्‍यांच्या हातात जनतेने सत्ता सोपवली आहे, अशी प्रतिक्रिया संजय फांजे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी आमदार प्रविण दटके, आमदार कृष्णा खोपडे, महापौर निता ठाकरे, सत्तापक्षनेते बाल्या बोरकर, अ‍ॅड.धर्मपाल मेश्राम, माजी डॉ. मिलींद माने, संजय फांजे, विनय दाणी, सुधीर राउत, डॉ.आनंद नाशिककर, श्रीकांत आगलावे,राम आंबुलकर,सुनील हिरणवार, मनिषा अतकरे, अर्चना डेहणकर, वैशाली चोपडे, नरेश बरडे, अश्विनी जिचकार, प्रभाकर येवले, सचिन पुण्यानी, प्रगती पाटील आदींची उपस्थिती होती.
 
वंदे मातरमचा उद्घोष करणार्‍यांच्या हातात सत्ता
 
दयाशंकर तिवारी पुढे म्हणाले, पश्चिम बंगालसह इतर काही भाजपला चांगले यश मिळाले आहे. जंगलराजचा अंत आणि राष्ट्रवादी प्रशासनाची स्थापना होणार असल्याने नागपुरात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे. हा विजय जनमताचा विजय असून आज एक विलक्षण सुवर्णयोग जुळून आला आहे. संपूर्ण ’वंदे मातरम’ या राष्ट्रभक्तीपर गीताचे १५० वे वर्ष साजरे करत असताना, याच गीताचे जनक महान साहित्यकार यांच्या बंगालमध्ये ’वंदे मातरम’चा उद्घोष करणार्‍यांच्या हातात सत्ता सोपवली आहे.
 
 
बंगालमध्ये सनातन परंपरेचा अपमान करणार्‍या व सत्तेचा गैरवापर करणार्‍यांना जनतेने सपशेल नाकारले आहे, तर आसाममध्ये विकासकामांवर विश्वास ठेवून जनतेने पुन्हा एकदा भाजपला कौल दिला आहे.
 
 
आम्ही जनतेने दिलेल्या या महान जनमताचा पूर्णतः सन्मान करतो. ’जनता जनार्दन’ नेहमीच विकासाला आणि प्राधान्य देते. या निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे. सामान्य नागरिक विकासाच्या राजकारणासोबत आणि राष्ट्रवादी विचारांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा आहे.
 
 
पश्चिम बंगालच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी : आमदार प्रविण दटके
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आणि गृहमंत्री अमित शहा यांचे सुक्ष्म नियोजन आणि संघटनबांधणी, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, महाराष्ट्र लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबतच हजारो कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने घेतलेल्या परिश्रमाचे हे फलित आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेच्या नावावर फोफावणारा गुंडाराज आणि विकासाचे केवळ स्वप्न दाखवून होत असलेली फसवणूक यावर हा निकाल चोख उत्तर आहे. एकीकडे विकासाच्या वाटेवर स्वार असताना पश्चिम बंगालची जनता मात्र तुष्टीकरणाला बळी पडत होती. मात्र श्री. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री श्री. अमित शाह यांनी या निकालातून पश्चिम बंगालच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी केली आहे, अशीही प्रतिक्रिया आमदार प्रविण दटके यांनी व्यक्त केली आहे.
 
गुंडाराज नाकारून जनतेने विकासाला दिली साथ दिली: अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम
 
पश्चिम बंगालमध्ये दीदींचा गुंडाराज संपुष्टात आणत भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात नवा इतिहास घडवला आहे. यासोबतच आसाम आणि पुद्दुचेरी या दोन्ही राज्यांमध्ये देखील एकहाती यश खेचून आणले आहे. हे यश म्हणजे जनतेने भारतीय जनता पक्षावर दाखविलेला विश्वास होय, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय जनता अभूतपूर्व विजय: रवी वाघमारे
 
 
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या मनमानी कारभारामुळे जनता वैतागून गेली होती. सर्वत्र गुंडगिरी, खंडणी राज, असुरक्षित महिला या सर्वांना नागरिक त्रासून गेल्याने मतदारांनी ममता हटविले आहे. बंगलादेशातील अवैध घुसपैठ, त्यांची भारतद्रोही कृत्ये व त्याला तेथील ममता सरकारकडूनच बंगलादेशातील नागरिकांना पाठिंबा व प्रोत्साहन मिळत असल्याने प्रचंड नुकसान होत असल्याने सत्तापरिवर्तन आवश्यक झाले होते. आसामसारख्या सीमावर्ती, राजकीयदृष्टया अतिशय महत्वाच्या राज्यातील भारतीय जनता पक्षाचा अभूतपूर्व विजय हा संपूर्ण भारत राष्ट्राचा विजय होय, अशी प्रतिक्रिया रामनगर येथील रवी वाघमारे यांनी व्यक्त केली.
.......