दिग्रसला 65.74 लाख रुपयांचा अपहार

आरोग्यधाम हॉस्पिटलच्या 7 जणांवर गुन्हे दाखल

    दिनांक :04-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
arogyadham-hospital : येथील आरोग्यधाम हॉस्पिटलच्या 2 युवक व 5 युवती कर्मचाèयांनी चक्क 65 लाख 74 हजार रुपयांचा अपहार केल्याने चांगलीच खळबळ उडाली. या 7 भामट्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाने आभासी व्यवहारातही शिताफीने चोरी करता येते याचा प्रत्यय दिला. येथील आरोग्यधाम हॉस्पिटलच्या अकाऊंटचा पासवर्ड आधी चोरला व या पासवर्डच्या माध्यमातून रक्कम आपल्या अकाऊंटवर घेण्याचा हा प्रकार, अर्थात मोठी चोरी उघडकीस आली आहे.
 
 
y4May-Aarogyadham
 
 
 
हॉस्पिटलच्या रुग्णांची जमा रक्कम ही संगणकीय कौशल्यात तरबेज असलेल्या त्या 7 कर्मचाèयांकडे आळीपाळीने जमा व्हायची. रुग्णांकडून पूर्ण पैसे घेऊन पासवर्ड आयडीच्या माध्यमातून पावती रद्द करून ती रक्कम स्वतःकडे जमा करणाèया या टोळीचे कृत्य हॉस्पिटलचे संचालक डॉ. संदीप दुधे यांच्या निदर्शनास आली.
 
 
हा विषय बाहेर न जाता पैसे जमा करा, आम्ही आपणास सोडून देऊ, असे सुरवातीला या भामट्यांशी बोलणे झाले. मात्र आम्ही चोरी केली नसल्याचे उलट उत्तर देणाèया 7 जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
 
गांधीनगर येथील सुजल निरपासे याने 29 लाख 21 हजार 510 रुपये, मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथील उमेश राठोड 18 लाख 82 हजार 90 रुपये, साखरा येथील रश्मी राठोड हिने 1 लाख 17 हजार 650 रुपये, वाइलिंगी येथील दीपाली पवार हिने 8 लाख 96 हजार 229 रुपये, साखरा येथील अंजली राठोड हिने 75 हजार 680 रुपये, मोखच्या प्रिया चव्हाण हिने 5 लाख 72 हजार 530 रुपये व हरसुल येथील सोनू वैद्य हिने 1 लाख 8 हजार 308 रुपये असा एकूण 65 लाख 74 हजार 49 रुपयाचा अपहार केला आहे.
 
 
या सर्वांनी 2022 ते 2025 या कालावधीत आरोग्यधाम हॉस्पिटलच्या सॉफ्टवेअरमध्ये स्वतःची आयडी वापरून हा अपहार केल्याची तक्रार डॉ. संदीप दुधे यांनी पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.