उष्माघातामुळे शेतातच शेतकर्‍याचा मृत्यू

    दिनांक :04-May-2026
Total Views |
मालेगाव
heatstroke Malegaon तालुयातील भौरद येथील ५५ वर्षीय शेतकरी दशरथ सिताराम ढोके यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याबाबत मुलगा उमेश ढोके यांनी मालेगाव पोलिस ठाण्यात जबानी रिपोर्ट दिला आहे.
 
heatstrock 
heatstroke Malegaon मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश ढोके हे शेतमजुरीच्या कामासाठी पत्नीसोबत नारायणगाव (जि. अहिल्यानगर) येथे गेले होते. दरम्यान, त्यांच्या वडिलांनी गावातील शेतात शेतीकाम सुरू ठेवले होते. २ मे रोजी उमेश ढोके घरी परतले असता त्यांचे वडील शेतात गेले होते आणि त्यानंतर घरी परतले नव्हते. ४ मे रोजी सकाळी उमेश कामानिमित्त बाहेर असताना त्यांच्या लहान भावांचा फोन आला. गावातील लोकांकडून वडिलांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याने उमेश तातडीने घरी परतले. गावातील अशोक पिराजी लोखंडे यांच्या शेतातील झोपडीत दशरथ ढोके मृत अवस्थेत आढळून आले.
heatstroke Malegaon घटनास्थळी डॉटर व पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार पार पाडले. दरम्यान, दशरथ ढोके यांच्या मृत्यूबाबत कोणताही संशय नसून कोणतीही तक्रार नसल्याचे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.