नागपूर,
MLA Bhende नवनियुक्त विधानपरिषद आमदार संजय भेंडे यांच्या निवासस्थानी जाऊन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्योदय परिवार, नागपूरचे सदस्य विवेक मेंढी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देत आमदार भेंडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी महापौर नंदा जिचकर, नगरसेवक रितेश गावंडे, महामंत्री नितीन महाजन, शरद जिचकार, अभय देशमुख, मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री अमित खोत तसेच संजय खोरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य: विवेक मेंढी, संपर्क मित्र