अर्जुनी मोरगाव,
fire breaks out तालुक्यातील केशोरी येथील पंढरीनगर येथे सोमवारी ४ मे रोजी सकाळी १० ते १०.३० वाजताच्या सुमारास एका सहा खोल्याच्या मोठ्या घराला अचानक आग लागून संपूर्ण घरासह कपडे, अन्न धान्य आदी जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीमुळे जवळपास ११.८७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सदाशीव शिवराम मडावी रा.पंढरीनगर (केशोरी) यांच्या घराला अचानक आग लागली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किट किंवा इतर कारणाची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मडावी यांच्या घराकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. घटनेची माहिती केशोरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत अर्जुनी नगरपंचायत अग्निशमनला पाचारण करण्यात आले. दरम्यान, अग्नशामक विभागाकडून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.fire breaks out मोपर्यंत संपूर्ण घर व साहित्य जळून राख झाले होते. विशेष म्हणजे, या आगीत रोकड व दागिने, इलेक्ट्रानीक साहित्य, धान्यसाठा, तांदूळ, भांडी, कपडे, खिडक्या-दरवाजे, झोपण्याचे पलंग, लाकडी छत व इतर फर्नीचर साहित्य पूर्णतः जळून मडावी यांचे अंदाजे ११ लाख ८७ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मंडळ अधिकारी पुंडलिक कुंभरे व ग्राम महसूल अधिकारी देवेंद्र बोरकर यांनी तहसीलदारांना प्रतिवेदन द्वारे दिली आहे. दरम्यान प्रशासनाने नुकसानग्रस्त निराधार व बेघर झालेल्या कुटुंबाला तात्काळ नुकसान भरपाई देत सद्या त्यांच्या राहण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.