हिंगणघाटात प्रथमच लाठी-काठी प्रशिक्षण

    दिनांक :04-May-2026
Total Views |
हिंगणघाट
Hinganghat news स्व. पांडुरंग तुळसकर व स्व. अजय भांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभिनव विचार मंच, हिंगणघाटच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अभिनव संस्कार शिबिर १५ ते १९ मे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
 
 
shibir
Hinganghat news मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात दररोज सकाळी ५.३० ते ९ या वेळेत होणार्‍या शिबिरात योग, प्राणायाम, मेडिटेशन, आर्ट, क्राफ्ट, सुंदर हस्ताक्षर, संगीत, नृत्य, विविध खेळ, मातीकाम, शिल्पकला व लाठी-काठी प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. नववी ते बरावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष साहित्य लेखन कार्यशाळाही घेण्यात येणार आहे.
Hinganghat news शिबिरासाठी मर्यादित जागा असून इच्छुक पालकांनी शिबिराचे नोंदणी शुल्क ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या लिंकवर करावी किंवा शिबिरस्थळी शिबिराच्या पहिल्या दिवशी सुद्धा नोंदणी करता येणार आहे. शिबिरासाठी नोंदणी करावी, असे आवाहन नगरसेवक प्राची पाचखेडे यांच्यासह आयोजनकांनी केले आहे.